रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडीच्या शाखेचे पुरंदर तालुक्यात दिमाखदार उदघाटन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडीच्या शाखेचे पुरंदर तालुक्यात दिमाखदार उदघाटन

पुरंदर

पुरंदर तालुका पुणे येथील निरा व मांडकी या गावी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) युवक आघाडीच्या शाखेचे उदघाटन जिल्हाध्यक्ष विकास साळवे व युवक जिल्हाध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रिपाइं(ए) मध्ये प्रवेश केला फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत करण्यात आले मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी घोषणा देत शहर दुमदुमून टाकले.

प्रसंगी पुरंदर तालुकाध्यक्ष बाबा माने,युवक पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल साबळे, मावळ युवक तालुकाध्यक्ष चंद्रकांत ओहाळ,युवक तालुका संघटक सचिन साळवे,पुरदंर युवक तालुकाध्यक्ष विनोद धेंडे,किशोर वंजारी,युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल ओहाळ,युवक जिल्हा सरचिटणीस प्रविण पवार,फैय्याज इनामदार,युवक शाखाध्यक्ष कुमार मोरे माजी उपसरपंच निरा, आदी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *