नवीन दुचाकी खरेदी करुन घरी परतणाऱ्या डॉक्टरवर सपासप वार, दोघांना अटक

नवीन दुचाकी खरेदी करुन घरी परतणाऱ्या डॉक्टरवर सपासप वार, दोघांना अटक

धुळे

एका तरुणाची अज्ञात संशयितांनी धारदार शस्त्राने वार करत त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घडली आहे. शिंदखेडा तालुक्यातील दरणे गावातील डॉ प्रेमसिंग राजेंद्र गिरासे असे या 21 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. पोळा सणाच्या औचित्यानें नवीन मोटारसायकल खरेदी करून घरी परतत असतांना ही घटना घडली आहे. अज्ञातांनी खून केल्यानंतर नवीन मोटरसायकल व मोबाईल हिसकावून पोबारा केला.

डॉ प्रेमसिंग शिंदखेडा येथे शोरूममध्ये नवीन मोटरसायकल खरेदी करण्यासाठी गेले होते. व्हेंटिनरी डॉक्टर असलेले प्रेमसिंग, पोळा सणाच्या दिवशी नवीन प्लॅटिना मोटरसायकल घेऊन घरी परत येत असतांनाच चिमठाणे गावाजवळ तीन संशयितांनी त्यांना रस्त्यात अडवले. यावेळी संशयितांनी प्रेमसिंग यांचा मोबाईल आणि रोकड हिसकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत संशयितांनी धारदार चाकूने प्रेमसिंग ला भोसकले. घटनेनंतर संशयित मारेकरी नवीन मोटरसायकल व मोबाईल घेऊन पसार झालेत.

प्रेमसिंग गिरासे रस्त्यावर थारोळ्यात पडलेले असल्याचे रस्त्यावर जाणाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर काही नागरिकांनी तात्काळ चिमठाणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र गंभीर दुखापत धुळे जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असतांनाच रस्त्यातच प्रेमसिंगचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती कळताच दरणे गावातील नागरिकांनसह स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रकरणी संतप्त जमावाने धुळे दोंडाईचा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत रोष व्यक्त केला.

जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा संतप्त गावकऱ्यांनी घेतला होता. ररस्त्यावर पोलीस चौकी असताना देखील त्याठिकाणी पोलीस थांबत नसल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला. यावेळी खून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल व आरोपींना तात्काळ अटक केली जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिल्यानंतर गावकाऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन तासात या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून शिंदखेडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *